एरंडोल मतदार संघात ग्रामीण भागासाठी अठरा कोटींचा निधी मंजूर.-आमदार चिमणराव पाटील.

Spread the love

एरंडोल- एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातील एरंडोल,पारोळा व भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामीणविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यामुळे मतदार संघातील विकासाची घौडदौड अशीच वेगाने सुरु राहील असा विश्वास आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केला.

एरंडोल मतदार संघातील तीनही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.शासनाच्या २५१५, १२३८ अंतर्गत मतदार संघातील ग्रामीण भागासाठी सुमारे अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.मतदार संघातील विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असल्यामुळे मतदार संघाची विकासाची घौडदौड वेगाने सुरु राहणार असल्याचा विश्वास आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केला.

यामध्ये पारोळा तालुक्यातील लोणी,करंजी बुद्रुक,करमाड बुद्रुक, कन्हेरे,म्हसवे, विचखेडा,वाघरे,शिरसमणी, भोंडन दिगर,बोळे,करमाड,टिटवी,आडगाव,गडगाव,ईटवे,उंदीरखेडा,कराडी,टेहू,ढोली,तरडी,तरवाडे,देवगाव,धूळपिंप्री,पळासखेडा बुद्रुक,शेवगे,सार्वे बुद्रुक,सावखेडा होळ, सावरखेडा, म्हसवे,हनुमंतखेडा, लोणीसिम, कराडी, खोलसर, पळासखेडा सिम,पिंप्री.प्र.ऊ,पोपटनगर, बहादरपूर, बाभळेनाग, बोळेतांडा,सावखेडा,मुंदाणे, मोंढाले,मोरफळ,टिटवी,टोळी,बाहुटे,मंगरूळ,सार्वे,वडगाव प्र.ए,वाघरे,विटनेर, वेल्हाणे, शिवरेदिगर या गावातील विविध विकास कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.

तसेच एरंडोल तालुक्यातील जवखेडा बुद्रुक,खर्ची खुर्द, धारागीर,अंतुर्ली खुर्द,खडके बुद्रुक,दापोरी, आडगाव, उमरदे, खडकेसिम, खेडगाव, बांभोरी खुर्द,जळू,जवखेडा बुद्रुक,टाकरखेडा,नागदुली, पातरखेडा,पिंपळकोठा खुर्द,रिंगणगाव, वनकोठे, विखरण,सावदा,हणमंतखेडा बुद्रुक,हणमंतखेडा सिम,खडके बुद्रुक,दापोरी, सोनबर्डी, हनुमंतखेडा खुर्द या गावांसाठी निधी मंजूर झाला आहे.भडगाव तालुक्यातील पिंपरखेड,पिंपळगाव बुद्रुक या गावांसाठी निधी मंजूर झाला आहे.निधी मंजूर झालेल्या गावांमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे,पेव्हर ब्लॉक बसवणे,सामाजिक सभागृह बांधकाम करणे, अभ्यासिका बांधकाम करणे,शाळांना संगणक संच देणे,एल.सी.डी.प्रोजेक्टर देणे,सभा मंडपाचे बांधकाम करणे,भूमिगत गटार बांधकाम करणे,पिकअप शेडचे बांधकाम करणे आदी कामे करण्यात येणार आहे.

मतदार संघातील कोणत्या गावात,कोणत्या कामासाठी आणि मंजूर निधी याची सविस्तर माहिती सर्व गावांमध्ये देण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक तथा पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी सांगितले.मतदार संघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र शिंदे,ग्रामीणविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेसह सर्व सहका-यांचे सहकार्य मिळत असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी निधी मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.दरम्यान ग्रामीण भागातील विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध होत असल्यामुळे आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फायदा होईल असा विश्वास पदाधिका-यांमध्ये व्यक्त केला जात आहे.

टीम झुंजार