सोयगाव तालुक्यात बारा हजार ८६ बाधित शेतकऱ्याच्या याद्या पूर्ण; सदोष याद्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द

Spread the love


सोयगाव, दि.३१(साईदास पवार) अतिवृष्टीच्या बाधित झालेल्या ८४ बाधित झालेल्या गावांपैकी ५९ गावांच्या याद्या पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सादर करण्यात आल्या आहे दरम्यान सोयगाव तालुक्यात बाधित झालेल्या ३२ हजार ९८० शेतकऱ्यांपैकी बारा हजार ८६ शेतकऱ्यांच्या नावे शासनाने ठरवून दिलेल्या नवीन प्रणालीत पूर्ण करण्यात आली आहे या नावांना जिल्हाधिकारी कार्यालयात पडताळणी करून हिरवा कंदील मिळताच या बारा हजार ८६ शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग होण्याची प्रक्रियेत सुरू होईल त्यामुळे तूर्तास शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या नुकसानीत ३८ हजार सातशे अंशी हेक्टरवर तडाखा बसला आहे या नुकसानी पोटी सोयगाव तालुक्याला ४९ कोटी ५९ लक्ष ६४ हजार इतका निधी मंजूर झालेला आहे या निधीच्या याद्याही जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आल्या होत्या परंतु शासनाने निधी वितरण ची प्रक्रिया बदलल्याने नव्याने प्रणालीत बाधित शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्याने निधी वितरणासाठी विलंब झाला होता

परंतु सोयगाव महसूल कडून तातडीने बाधित शेतकऱ्यांची आधार कार्ड संकलित करून ५९ गावांच्या १६ हजार ४६० हेक्टरवर याद्या पूर्ण करून बारा हजार ८६ शेतकऱ्यांच्या खात्यावर २२ कोटी २५ लक्ष ४१ हजार रु वर्ग करण्यासाठी याद्या जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आल्या आहे या यद्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात पडताळणी करण्यात येताच हिरवा कंदील मिळताच निधीची रक्कम थेट औरंगाबाद वरून महा आय टी कडून वर्ग करण्यात येणार आहे उर्वरित २५ गावातील बाधित शेतकऱ्यांच्या याद्याही करण्याचे काम गतिमान करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली आहे…

हे पण वाचा

टीम झुंजार