एकाच जागेवर मंजूर रस्त्याचे तीन तुकडे; जरंडीतील प्रकार

Spread the love



सोयगाव, दि.३१.(साईदास पवार).जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या मंजूर झालेल्या ३६८ मीटरच्या २५/१५ अंतर्गत रस्त्याचे काम सलग मंजूर असताना ठेकेदाराने तीन ठिकाणी तुकडा करून या रस्त्याचे काम हाती घेतले आहे त्यामुळे या रस्त्याच्या २५ लक्ष ।मजूर निधीचा चुराडा झालेला आहे

जरंडी ता सोयगाव गावात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून २५/१५ योजनेतून ३६८ मीटरच्या लांबीचा रस्ताचे काम मंजूर आहे या रस्त्याचे काम सलग करण्याचे अंदाजपत्रकात नमूद असताना कामावरील ठेकेदाराने कोणालाही न विचारता या मंजूर रस्त्याचे तीन तुकडे करून काम सुरू केले आहे त्यातही मातीचा भराव करून रस्त्याचे काम सुरू करण्यात येऊन रस्त्या च्या कामासाठी सोलिंग न वापरता दगडगोटे टाकून रस्त्याची दाबाई करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले दरम्यान या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून २५ लक्ष रु निधी मंजूर केला, परंतु या निधीचा चुराडा करण्यात येत आहे

—–जिल्हा परिषदेच्या या रस्त्याच्या कामावर पंचायत समितीच्या अभियंत्याने अद्याप रस्त्याच्या कामाची पाहणी केलेली बसून तुम्ही फक्त काम आटोपा यानुसार रस्त्याचे काम सुरू आहे दरम्यान रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे करण्यात येत असून रस्त्यावर खडी ऐवजी नदीच्या पात्रातील दगड गोटे वापरण्यात येत आहे

—–मापात पाप
या रस्त्याच्या कामाच्या मापात पाप करण्यात येत आहे संबंधित ठेकेदाराकडून तीन तुकड्यात करण्यात येणाऱ्या या रस्त्याच्या कामात रुंदी मध्ये माप कमी करण्यात येत असून प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ करण्यात येणाऱ्या या रस्त्याच्या तुकड्यात रस्ता नव्हे तर मैदान तयार करण्यात येत आहे त्यामुळे सांड पाणी या रस्त्याच्या अडचणी मुळे दुर्गंधी युक्त पाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिरणार आहे त्यामुळे रस्ता करून पुन्हा गैरसोय होणार आहे..
कोट-जरंडी रस्ता प्रकरणी जिल्हा परिषदचे कनिष्ठ अभियंता राजेश राजगुरू यांचेशी तब्बल चारवेळा संपर्क केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही…

टीम झुंजार