सोयगाव तालुका खरेदी विक्री संघावर अखेर प्रशासक, संजय गाजुलवाड यांची प्रशासक म्हणून नियुक्त

Spread the love


सोयगाव, दि.०२.(साईदास पवार). दोन वर्षांपूर्वी मुदत संपलेल्या तालुका खरेदी विक्री संघावर अखेर प्रशासक नियुक्त करण्यात आला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या आदेशानुसार सहायक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांच्या आदेशाने संजय गाजूलवाड (सहकार अधिकारी श्रेणी-१) यांना सोयगाव तालुका खरेदी विक्री संघावर प्रशासक म्हणून आदेशीत करण्यात आले आहे

दि.३० डिसेंबरला हे आदेश देण्यात आले आहे
सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाची संचालक मंडळाची मुदत दि.२० जुलै २०२० ला संपली होती परंतु खरेदी विक्री संघाची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत नसल्याने अखेर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या पत्रावरून सहायक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांनी संजय गाजुलवाड यांना प्रशासक पदी नियुक्त केले आहे त्यामुळे बाजार समिती सह आता खरेदी विक्री संघावरही प्रशासक राहणार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार