सोयगाव, दि. ०२(साईदास पवार) हनुमंतखेडा (ता. सोयगांव) ये़थे मा. खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित जंगी कुस्त्यांच्या सामन्यात अनेक पहेलवांनानी सहभाग घेतल्याने मोठ्या संख्येने उपस्थित कुस्ती प्रेमींना थरारक सामन्यांचा आनंद घेता आला. आमदार उदयसिंग राजपुत यांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले. पंधरा वर्ष वयोगटातील मल्लांच्या कुस्तीने सुरुवात झालेल्या सामन्यात पहाता पहाता रंगत वाढत गेली दुपार नंतर नामांकित मल्लांच्या सामने अंत्यत रोमांचक झाले
विजेत्यांना दहा रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात आले. अंतिम सामना प्रविण देशमुख आणि बबलू पहलवान यांच्यात लढत झाली. एकमेकांवर चाल – प्रतिचाल करत सामना रंगात आला अर्धा तास चाललेल्या सामन्यात दोघेही हार मानण्यात तयार न झाल्याने दोघांना संयुक्त विजेता घोषित करीत सात हजार रुपयाचे रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील सोनवणे, सरपंच दादाभाऊ चव्हाण, संतोष पवार राजेंद्र चव्हाण, तुकाराम पाटील, सुधाकर जाधव, रमेश चव्हाण आदींसह परिसरातील ग्रामस्थ, कुस्ती प्रेमी उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






