सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज एरंडोलला प्रा.श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान.

Spread the love

एरंडोल-श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले हायस्कूलच्यावतीने मंगळवारी (ता.३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.व्याख्यानास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन व पदाधिका-यांनी केले आहे.

महात्मा फुले हायस्कूलतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी सात वाजता महात्मा फुले पुतळ्याजवळ प्रा.श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.आमदार चिमणराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून द्वीप प्रज्वलन नासिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे,भाजपचे लोकसभा प्रवास संपर्क प्रमुख advt.किशोर काळकर,कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने यांच्या हस्ते करण्यात येईल.

जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील,ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाब वाघ,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात येणार आहे.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,औदुंबर साहित्य रसिक मंचचे अध्यक्ष advt. मोहन शुक्ला,पालिकेचे प्रशासक विकास नवाळे,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,

डॉ.के.ए.बोहरी,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोज पाटील उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमासाठी सावता माळी व्यायाम शाळा,नागराज मित्र मंडळ,नम्रता गणेश मंडळ,बालवीर गणेश मंडळ,बालाजी गणेश मंडळ, महात्मा फुले युवा मंचच्या पदाधिका-यांचे सहकार्य असून व्याख्यानास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन,सचिव सुकलाल महाजन,शालेय समितीचे चेअरमन अरुण माळी यांचेसह पदाधिकारी व विश्वस्त मंडळाने केले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार