एरंडोलला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न…

Spread the love

एरंडोल :- येथील देशमुख मढी परिसरात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने नम्रता गणेश मंडळ, अनिलभाऊ महाजन मित्र परिवार व कल्पना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर करण्यात आले…

शिबिराच्या प्रारंभीस क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त तहसीलदार अरुण माळी हे होते. याप्रसंगी बोलताना अरुण माळी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकला, त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे स्त्री कुळाचा उद्धार झाला असून आज आपल्याला सर्व क्षेत्रात स्त्रियांची अभूतपूर्व प्रगती होतांना दिसत आहे असे सांगितले… सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, माजी नगरसेवक रुपेश माळी, युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैत्री सेवा फाँडेशनचे पियुष चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन समता परिषदेचे शहराध्यक्ष सागर महाजन यांनी केले… सदर शिबिरास सामाजिक कार्यकर्ते अनिलभाऊ महाजन डॉ.ऋषिकेश पाटील, संदीप पाटील व नम्रता गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले… या तपासणी शिबिराचा सुमारे तीनशे अबालवृद्ध रुग्णांनी लाभ घेतला.


याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, युवासेनेचे शहर प्रमुख प्रमोद महाजन, महात्मा फुले युवा क्रांती मंचचे संस्थापक कैलास महाजन, विकास सोसायटीचे संचालक योगराज महाजन, ईश्वर पाटील, विक्रम महाजन, तुळशीराम महाजन, गजानन महाजन, गोपाल महाजन, सखाराम महाजन, सुकदेव पाटील, समाधान महाजन, कमलेश महाजन, युवराज महाजन, अमोल देशमुख, प्रवीण महाजन, राजेंद्र महाजन, संजय महाजन, योगेश शिंपी, प्रकाश महाजन, दीपक महाजन, किशोर महाजन, मयूर महाजन, कुणाल पाटील, राज पाटील, बबलू मराठे, शुभम महाजन, गौरव महाजन, यश महाजन आदी उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार