कुटुंबातील 8 जणांना 4 वर्षीय चिमुकल्याने दिला मुखाग्नी; गावावर शोककळा, नेमकं काय झालं..?

Spread the love

सध्या देशात अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच एकीकडे देशातील लोक नववर्षाचे जल्लोषात स्वागत करत होते, तर दुसरीकडे याच राजस्थानमध्ये नवर्षाच्या पहिल्याच दिवशी एका कुटुंबावर काळाने घाला घातला. एका भीषण रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, यातील 9 जण एकाच गावातील, तर 8 जण एकाच कुटुंबातील होते. जयपूरच्या सामोदमधील 9 जण नववर्षाच्या पहिल्या दिवशी कुलदेवीचे दर्शन घेऊन परतत होते. यावेळी झालेल्या भीषण अपघातात 2 सख्ख्या भावांसह पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाला.

एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू :

कैलाशचंद आणि सुवालाल यांचे कुटुंब 1 जानेवारी रोजी कुलदेवी मातेचे दर्शन घेऊन त्यांच्या नवीन वाहनाने घरी परतत असताना खंडेला-पलसाणा रस्त्यावर त्यांच्या आधी दुचाकीला आणि नंतर ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात ज्या 12 लोकांचा मृत्यू झाला, यातील 9 जण एकाच गावातील होते. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे, यातील एकाच कुटुंबातील 8 जणांचा तिरडी एकाचवेळी उठली. घरातील चार वर्षीय चिमुकल्याने या आठ जणांना एकाच वेळी मुखाग्नी दिला. हे दृष्य पाहून तिथे उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.

एकाच चितेवर 8 मृतदेह :

या अपघातात कैलाशचंद यांची दोन मुले विजय व अजय यांच्यासह मुलगी रेखा, विजयची पत्नी राधा, सुवालाल यांच्या दोन सूना पूनम व अनुराधा, नातू आरव व नात निक्कू, शेजारी अरविंद यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर सोमवारी सर्व मृतदेह एकत्र गावात आल्यावर गावात एकच खळबळ उडाली. घराच्या अंगणात ठेवलेले मृतदेह पाहून गावात नीरव शांतता पसरली. यावेळी 8 तिरड्या एकत्र उचलल्या आणि सर्वांना एकाच चितेवर जाळण्यात आले. अंत्ययात्रेत गावातील शेकडो लोक सामील झाले होते. यावेळी प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द होता… हे राम!

हे वाचलंत का ?

टीम झुंजार