एरंडोल- मतदार संघात विकासनिधी देतांना कोणताही भेदभाव न करता सर्वाना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून,मातादार संघाचा विकास करणे हे आपले उद्दिष्ट्य असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.तालुक्यातील कढोली ते पाळधी आणि बांभोरी ते वैजनाथ ते कढोली या रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी परिसरातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला.यावेळी आमदार चिमणराव पाटील साडेतीन वर्षात मतदार संघात पूर्ण झालेली कामे आणि सुरु असलेली कामे तसेच आगामी काळात करण्यात येणारी कामे याबाबत माहिती दिली.
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मतदार संघातील सर्व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतक-यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या पोकरा योजनेबाबत प्रश्न उपस्थित करून योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्याना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.भूमिपूजन करण्यात आलेल्या दोनह रस्त्यांची ग्रामस्थांकडून अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती त्यामुळे रस्त्याचे भूमिपूजन करतांना मानसिक समाधान मिळत असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते परिसरातील निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती मोहन सोनवणे,पन्नाभाउ सोनवणे,खेडीचे सरपंच संतीश सोनवणे,कढोलीचे सरपंच किशोर नन्नवरे,वैजनाथचे सरपंच नाना पाटील,टाकरखेड्याचे सरपंच advt.प्रविण पाटील,गोकुळ पाटील,नारायण सोनवणे,निलेश भोई यांचेसह परिसरातील ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






