VIDEO : धावत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्धाचा तोल गेला अन्.. धक्कादायक व्हिडिओ समोर.

Spread the love

सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. मात्र, प्रवाशांना वाचवण्यासाठी रेल्वे सुरक्षा कर्मचारी फलाटावर तैनात असतात. भारतीय रेल्वेने सर्व प्रवाशांना कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात असा सल्ला देते. असे असतानाही प्रवासी या नियमांकडे दुर्लक्ष करून ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. परिणामी त्यांना अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. नुकताच असा एक व्हिडीओ समोर आला आहे,

ट्रेनमध्ये चढताना वृद्धाचा तोल गेला अन्

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) अधिकाऱ्याने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धाचे प्राण वाचवले. रेल्वे मंत्रालयाने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. व्हिडिओ शेअर करताना, भारतीय रेल्वेने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बिहारच्या पूर्णियामध्ये, एका सतर्क आरपीएफ जवानाने एका चालत्या ट्रेनमध्ये चढताना अपघात झालेल्या प्रवाशाला वाचवले. कृपया चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा / उतरण्याचा प्रयत्न करू नका.” हा व्हिडिओ एक लाख 88 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि लोक रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आहेत.

पहा व्हिडिओ :

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी ही प्रतिक्रिया दिली

20 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे व्हिडीओमध्ये असे दिसून येते की तो ट्रेन आणि ट्रॅकच्या मध्ये पडतो आणि ट्रेनने त्याला काही फूट दूर खेचून नेले. तेव्हा या वृद्धाचा जीव वाचवण्यासाठी एक आरपीएफ जवान पुढे आला आणि त्याचा हात धरून त्याला बाहेर काढले. मात्र, चालती ट्रेन काही सेकंदांनी थांबते. एका ट्विटर युजरने लिहिले की, “शाब्बास! शाब्बास. तुम्ही एका माणसाचा अनमोल जीव वाचवला आहे. मी त्याच ट्रेनमध्ये होतो.”


हे वाचलंत का ?

टीम झुंजार