एरंडोल- शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मुलभूत सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.कासोदा ते नांदखुर्द रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांचेहस्ते परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी मतदार संघातील पूर्ण झालेल्या विकासकामांची माहिती ग्रामस्थांना दिली.
ग्रामीण भागातील रस्ते,पाणी,विज, आरोग्य यासारख्या समस्या सोडविण्यासाठी बांधील असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्यामुळे मतदार संघात सुरु असलेली विकासकामाची घौडदौड वेगाने सुरु राहणार असल्याचे सांगितले.पोकरा टप्पा क्रमांक दोन या शेतक-यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या योजनेत मतदार संघातील गावांचा समावेश झाल्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास जिल्हा दुध संघाचे संचालक दगडू चौधरी,पंचायत समितीचे माजी सभापती गबाजी पाटील,कासोद्याचे सरपंच महेश पांडे,मालखेड्याचे माजी सरपंच मुकुंदा पाटील,फरकांडे येथील उपसरपंच शरद पाठक,रमेश जमादार,संदीप मराठे,सोनू तांदळे यांचेसह परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कासोदा येथे आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हा दुध संघाचे नवनिर्वाचित संचालक दगडू चौधरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास आमदार चिमणराव पाटील यांनी उमेदवारी दिली.तसेच माझ्या विजयासाठी प्रयत्न करून मला दुध संघात नेतृत्व करण्याची संधी दिल्याची भावना दगडू चौधरी यांनी व्यक्त केली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






