पत्रकार समाजात जनजागृतीचे काम करतात:प्रशासक विकास नवाळे,नगरपालिका व तेली समाजातर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार.

Spread the love

एरंडोल- पत्रकार समाजात जनजागृती करण्याचे काम करीत असतात,पत्रकारांनी नेहमीच समस्यांना वाचा फोडली आहे असे प्रतिपादन नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी केले.पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव अध्यक्षस्थानी होते.यावेळी पालिकेतर्फे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी पत्रकार जागल्याची भूमिका पार पाडत असल्याचे सांगितले.वर्तमान पत्रांमुळेच स्वातंत्र्य लढ्याच्या चालवली सुरु झाल्याचे सांगितले.

समाज जागृतीचे काम पत्रकार करीत असतात. शहरातील समस्यांची माहिती वर्तमान पत्राद्वारे समजत असल्यामुळे सर्व समस्यांना पत्रकारांनी वाचा फोडावी असे आवाहन त्यांनी केले.नगरपालिकेस मिळालेल्या पुरस्कारात सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाट असून शहरात पालिकेतर्फे राबविण्यात येणारे उपक्रम कर्मचा-यांमुळेच यशस्वी होत असल्याचे सांगितले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव,जावेद मुजावर,संदीप बोढरे, संजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.करनिरीक्षक डॉ.अजित भट यांनी सुत्रसंचलन केले.संगणक अभियंता विकास पंचबुद्धे यांनी आभार मानले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव,कमरअली सय्यद, मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय चौधरी, रतिलाल पाटील,आल्हाद जोशी, नितीन पाटील,विजय महाजन,संदीप बोढरे यांचा पालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे,विक्रम घुगे,भूषण महाजन,डॉ.योगेश सुकटे,आनंद दाभाडे,अशोक मोरे,हितेश जोगी,दीपक गोसावी,विनोद जोशी यांचेसह पालिका कर्मचारी उपस्थित होते.

तेली समाजातर्फे सत्कार.

एरंडोल तालुका व शहर तेली समाजातर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.जिल्हा बँकेचे संचालक तथा पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील अध्यक्षस्थानी होते.सभापती अमोल पाटील,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,उद्योजक डॉ.राजेंद्र चौधरी,प्रा.शिवाजीराव अहिरराव यांच्याहस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सर्व पत्रकारांचा तेली समाज मंडळाचे पदाधिकारी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत) यांनी प्रास्ताविक केले.तालुकाध्यक्ष गुलाब चौधरी यांनी आभार मानले.कार्यक्रमास बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,युवासेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील,बाळासाहेब पाटील,प्रवराज पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

टीम झुंजार