सोयगाव, दि.०९.(साईदास पवार).सोपान दादा चषक क्रिकेट स्पर्धेत घाटनांद्रा ता सिल्लोड संघाने घोसला संघावर मात करून विजेतेपद पटकावले तर उपविजेता घोसला संघ ठरला आहे विजेते आणि उपविजेता संघांना उप आयुक्त सामाजिक न्याय जयश्री सोनकवडे विचारवंत गोपाल सिंग बच्छिरे, नंदा शिरसाठ मराठा प्रतिष्ठानचे सोपान गव्हांडे माजी सभापती चंद्रकांत पाटील आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले विजेत्या संघाला २१ हजार रु आणि ट्रॉफी व उपविजेता संघाला १५ हजार व ट्रॉफी असे बक्षिसाची स्वरूप होते
दरम्यान उपआयुक्त सामाजिक न्याय जयश्री सोनकवडे यांनी खेळा सोबतच शिक्षणाकडे लक्ष द्या असे आवाहन केले विचार वंत गोपाल सिंग बच्छिरे नंदा शिरसाठ आदींनी मनोगत व्यक्त केले सोपान गव्हांडे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी सरपंच गणेश माळी समाधान गव्हांडे ज्ञानेश्वर युवरे आप्पा वाघ आबा उगले सोनू तडवी विजय बावसकर समाधान बावस्कर धीरज सोनवणे मुस्तकिम पटेल अमोल शेळके गणेश तायडे सोपान गाडेकर आदींनी पुढाकार घेतला होता गणेश माळी यांनी आभार मानले..
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






