Viral Video : ऑस्ट्रेलियाच्या बीचवर अजय देवगनच्या गाण्याचा धुमाकूळ, खांद्यावर साऊंड अन्…

Spread the love


Viral Video : गाण्याचं वेड असणारे अनेक लोकं आपण पाहिले असतील. गावात ट्रॅक्टरवर ९० च्या दशकातील गाणे मोठ्या आवाजात वाजवणारे अनेक पाहिले असतील किंवा रूममध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवून डान्सही अनेकजण करत असतात. पण आपण जिथे जाऊ तिथे भलामोठा साऊंड सोबत घेऊन जाणारे आपण क्वचितंच पाहिले असतील. अशाच काही पर्यटकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरूण ऑस्ट्रेलियाच्या बीचवर फिरायला गेलेले दिसत आहेत. तर एकाने मोठा साऊंड आपल्या खांद्यावर घेऊन गाणे वाजवताना दिसत आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याचं ‘आये हम बाराती’ हे गाणं चालू असून या गाण्याने बीचवर धुमाकूळ घातला आहे.

https://www.instagram.com/reel/CmrDsXRhiSr/?igshid=YmMyMTA2M2Y=

दरम्यान, बीचवरील अनेकजण त्यांच्याकडे पाहत आहेत. भारतीय गाण्यांचा डंका या तरूणांनी ऑस्ट्रेलियाच्या बीचवर वाजवला अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ सध्या अनेकांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या व्हिडिओला तीन लाख लोकांनी लाईक केलं आहे.

टीम झुंजार