धरणगांव प्रतिनिधी / सतिष शिंदे
धरणगाव : – येथे सावित्रीमाई फुले, विरांगणा झलकारी देवी, फातीमाबी शेख, मासाहेब जिजाऊ, ह्या महामातांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून आज ९ जानेवारी रोजी भारतातील पहिल्या मुस्लिम आद्य-शिक्षिका व सावित्रमाई फुले यांच्या सहकारी फातिमाबी शेख जयंतीनिमित्त, सत्यशोधक विचार मंचतर्फे पाताळ नगरी येथे”रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्त तपासणी शिबिरात असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला.
रक्त तपासणी शिबिराला ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गिरीश चौधरी, समुपदेशक डी जी शिंपी सर, महालॅब टेक्निशियन अतुल पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेश्वर काकडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या तत्पूर्वी फातिमाबी शेख यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी नगरभाई मोमिन, डी.जी.शिंपी, सामाजिक कार्यकर्ते मधुकर सिताराम माळी, व्याख्याते लक्ष्मण पाटील, पी डी पाटील, विक्रम वाघमारे, हसन रझा, गोरख देशमुख, आकाश बिवाल, मयूर भामरे, प्रविण मोरे, नत्थु मोमिन, भिकन मोरे, इस्माईल मोमीन, इरफान मोमीन, करीम मोमीन, मोइदीन मोमीन, वसीम मोमीन, आफताब मोमिन, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, निलेश पवार, किशोर पवार, प्रफुल मराठे, हेमंत माळी, प्रमोद पाटील, राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






