यावल : सध्या देशात ऑनलाईन गेम्स खेळनार्याचे प्रमाण खूप वाढले आहेत अश्यातच त्यांची फसवणूक झाल्याच्या घटनांमध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात ऑनलाइन तीन पत्ती खेळात एका तरूणाची तब्बल ३२ लाखात फसवणूक झाल्याचा प्रकार यावलमध्ये घडला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील या व्यावसायिक तरुणाला दोन अज्ञात लोकांनी संपर्क साधला आणि त्याला तीन पत्ती व ड्रॅगन टायगर हे गेम खेळण्यास लावले आणि त्यास त्यासाठी प्रोत्साहित केले. तरुण गेम खेळत असतांना या दोन जणांनी तरुणाच्या बँक खात्यातून तब्बल ३२ लाख ५० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने लांबवले.
आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने तरुणाने यावल पोलीस स्टेशन गाठले. त्याच्या फिर्यादीवरुन दोन अज्ञात लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






