जळगाव : – राज्यातील अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. जळगावमध्ये देखील थंडीचा जोर वाढला आहे. जळगावचे किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली आले असून यंदाच्या तापमानातील हा निच्चांक आहे.
हवामान विभागाने यंदा कडाक्याच्या थंडीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये तीन ते चार दिवस पारा १० अंशापेक्षा कमी झाला. परंतु, तर डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कधी थंडी तर कधी गरमी जाणवत होती. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच थंडीचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात ही थंडी कायम आहे.
जानेवारी महिन्यात किमान तापमानाची सरासरी १० अंशापर्यंत खाली आली. गेल्या पाच वर्षांत जानेवारी महिन्यातील तापमानाची सरासरी ही १३ अंश इतकी होती. मात्र, यंदा ही सरासरी ३ अंशानी कमी झाली आहे. आता पारा ६ अंशावर आल्याने कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावरदेखील परिणाम होताना दिसून येत आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






