एरंडोल- श्रीक्षेत्र पद्मालय तालुका एरंडोल येथे सन 2023 या वर्षात आलेली फक्त एकमेव अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सुमारे दीड लाख भाविकांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. मंदिर प्रशासनातर्फे भाविकांसाठी कोणत्याही प्रकारची सोयी व सुविधा उपलब्ध नसल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली.अंगारकी चतुर्थी निमित्त पहाटे साडेचार वाजता धर्मदाय आयुक्त मोहन गाडे यांचे हस्ते श्री गणेशाची महापूजा व अभिषेक करण्यात आला. पहाटे पाच वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती
दर्शन घेण्यासाठी भाविकांना सुमारे चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत होते. सकाळी आठ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत तर लांब अशी भाविकांची रांग लागली होती. पारोळा येथील विलास प्रकाश पाटील आणि पद्मालय देवस्थान यांचे कडून फराळ व फळ वाटप करण्यात आले. हनुमंतखेडे सिम एरंडोल येथील सुधीर पाथरवट यांचे तर्फे चहा वाटप करण्यात आले
रिंगणगाव व तळई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा पुरवली एरंडोल नगरपालिकेतर्फे अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांसह बंब तैनात करण्यात आला होता. उदय तल्हार यांनी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. एरंडोल, पाचोरा, जळगाव, आगारा तर्फे भाविकांसाठी ज्यादा बसेसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. पहाटे पाच वाजेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे उपनिरीक्षक शरद बागल यांचे मार्गदर्शनाखाली एरंडोल, पारोळा,धरणगाव, कासोदा, मारवड येथील पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी बंदोबस्त चोख ठेवला.
दरम्यान भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, माता-भगिनींसाठी सुलभ शौचालय नसल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. 100 रुपयाची पावती फाडून भाविकांना स्पेशल दर्शन रांगेसाठी मंदिर प्रशासनाचे विश्वस्त व कर्मचारी व्यस्त होते. इतर हजारो भाविकांचा लाईन इकडे बघण्याच्या ही वेळ मंदिर प्रशासनाकडे नव्हती, सुमारे चार ते पाच भाविक हे लाईनीतच उभ्ये असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. स्पेशल दर्शनाची पावती व मंदिराची देणगी लाखो रुपये गोळा होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची सुख सुविधा या ठिकाणी करण्यात येत नाही याची खंत व्यक्त करण्यात येते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






