कल्याण : येथून एका प्रियकराशी ब्रेकअप करून दुसऱ्या प्रियकराशी संबंध जोडल्याच्या रागातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. आदित्य बर (२२) असं मृत तरुणाचं नाव आहे तर ललित संतोष उज्जेनकर (२२) असं मुख्य संशयित आरोपीचं नाव आहे. ललितसह अन्य तिघं फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथक रवाना केली आहेत.
नेमकं काय घडलं?
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, किरण सोनवणे (१९) ही तिच्या भावासोबत दिव्यात राहते. तर खडेगोळवली परिसरात तिची आई राहते. तसंच ललित उज्जैनकर हा तरुण सुद्धा खडेगोळवली परिसरातच राहतो. किरण आणि ललितमध्ये आधी प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये ब्रेकअप झाला होता. त्यानंतर किरणने आदित्यशी मैत्री केली होती. त्यामुळे ललितचा आदित्यवर राग होता.दरम्यान, किरणच्या भावाचा एक कुत्रा आहे, हा कुत्रा ललितकडे होता. हाच कुत्रा नेण्यासाठी शनिवारी रात्री किरण आदित्यसोबत खडेगोळवली परिसरात ललितकडे आली होती.
यावेळी तिघांमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या ललितने काही साथीदारांच्या मदतीने आदित्यला मारहाण केली अन् चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आदित्यच्या जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनेनंतर फरार झालेल्या ललित आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार पथक नेमली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली. दरम्यान, एकाच दिवसात दोन प्रेम प्रकरणांचा अशा पद्धतीने झालेला अंत वाचून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






