प्रतिनिधी – पारोळा
पारोळा :- माध्यमिक विद्यालय शिवरे दिगर येथे आज दि.12 जानेवारी 2023 रोजी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.आर.पाटील सर तर प्रमुख पाहूणे म्हणून श्री.आर.जी.पाटील सर होते.प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात झाली इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत साजर केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मनोगत व्यक्त केले सुत्रसंचालन इयत्ता 6 वीच्या विद्यार्थीनी खुशी समाधान पाटील व दिव्या सुधाकर पाटील यांनी केले अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी आपले विचार व्यक्त केले आभार प्रदर्शन प्रशांत पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व अध्यक्षाच्या संम्मतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






