ठाणे – राजमाता जिजाऊ आऊसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्त्य साधत विद्यादीप विद्यालय कोपरखैरने येथे तीन दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवाचे उद्ग घाटन मोठ्या उत्साहात छ्त्रपतीशिवाजी महाराज उद्यान सेक्टर १ ते ४ येथे करण्यात आले .या क्रीडा महोत्सवाच्या उद्गघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय नवीमुंबई चे माजी महापौर सुधाकर जी संभाजी सोनवणे हे हजर होते .
कोपरखैरणे सेक्टर 4 या विभागात असणाऱ्या विद्यादीप विद्यालय या मराठी , सेमि इंग्रजी व इंग्रजी माध्यमाची शाळेच्या क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी विभागाच्या माजी नगरसेविका सायली शिंदे तसेच समाजसेवक नारायण शिंदे , शिवसेना नेते मधुकरजी राऊत ,माजी नगरसेवक सुरेश दादा सालदर साहेब , संस्थेचे अध्यक्ष योगेश हन्नूरकर , शिक्षण विभागचे विस्तारअधिकारी खुशाल चौधरी सर , केंद्रसमन्वयक गोसावी सर , मुख्यध्यापक भिकाजी सावंत , समाजसेवक वसंत जाधव सर , शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा गवळी पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्यासंखेने हजर होते . यावेळी उद् घाटन पर संदेशात सुधाकरजी सोनवणे यांनी शाळेच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दलकौतुककरत पुढील वाट चालीस शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यानी खेळ हा खिलाडूवृत्तीने खेळून आपणास नितांत आवडणाऱ्या कोणत्याही खेळात आपले करिअर करावे असे सुचित केले . मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व युग पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली .पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करून मशाल पेटवून ती विद्यार्थ्यांमार्फत शाळेच्या मैदानावर फिरवण्यात आली.
या वेळीशाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात स्वच्छता, रहदारीचे नियम ,स्वच्छ सर्वेक्षण, पर्यावरण जतन, माझी वसुंधरा, तंबाखूमुक्त शाळा इत्यादींबाबत उद्बोधन पर बोधवाक्य लिहिलेले फलक व फुगे देण्यात आले होते . या दिमाखदार सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आकाशात शालेय नामफलक व फुगे सोडून वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद् घाटन करण्यात आले. वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी ,खो-खो ,लंगडी ,धावणे ,रिले ,गोळा फेक , थाळी फेक , लांब उडी , रिंगरेस तसेच लहान मुलांसाठी विविध आकर्षण बौद्धिक खेळांचे देखील आयोजन केले आहे.सदर महोत्सवाच्या आयोजनासाठी दिपक नवले, अमोल खिल्लारे, चन्द्रकान्त बरफ, शितल जुनघरे , वंशिता पाटिल , मनीषा शिलीमकर, शिल्पा मोरे , सुधा शर्मा , वर्षा शिर्के , कोमल पाटील , रेश्मा धुमाळ , अलका पवार यांनी अथक परिश्रम घेतले .सदर महोत्वासाठी पंच म्हणून खो खो चे राष्ट्रियखेळाडू साक्षी सर जीने , राज्यस्तरीय खेळाडू शितलडोके , वैष्णवी पाटिल यांनी तर कबड्डी साठी शुभमदळवी , अंकुश सूर्यवंशी व सुयोग सालोखे यानीकामगिरी पार पाडली.
हे वाचलंत का ?
- प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली,अन् स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं.
- तिसऱ्यांदा मुलगी झाल्याचा राग आला म्हणून नराधम पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले, पेटलेल्या अवस्थेत धावली रस्त्यावर पण……
- मैं तेरे प्यार में पागल! ६ मुलांची आई पडली भिकाऱ्याच्या प्रेमात, घरातून रोख रक्कम घेवून भिकाऱ्यासोबत पळाली; पतीची पोलिसात तक्रार दाखल.
- Video:पत्रिका छापल्या, मंडप सजला नवरी म्हणाली, ‘माझं दुसऱ्यावर प्रेम आहे’, बापानं अन् भावानं गावासमोरच लेकीवर धाडधाड गोळ्या घातल्या ठार केल.
- Viral Video: लग्नादरम्यान अचानक वराचा मित्र स्टेजवर पोहोचला, वराच्या कानात कुजबुजला अन् क्षणार्धात मोडलं लग्न; पहा धक्कादायक व्हिडिओ.