शबरी सेवा समितीच्या वतीने आयोजित तालुक्यातस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत सांगवी आश्रमशाळेचे घवघवीत यश????️????️????????

Spread the love


शिरपूर ( सांगवी ) :- मुंबई येथील शबरी सेवा समिती निरोगी आरोग्यासाठी महाराष्ट्रभर सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करीत असते. शिरपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन सांगवी येथे करण्यात आले होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून डॉ. निता सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी प.स.शिरपूर या उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून सांगवी चे लोकनियुक्त सरपंच श्री. कनिलाल दादा पावरा शेमल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रशेखर पाटील, हाडाखेड शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. शशिकला पाटील, पळासनेर शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र पाटील, सांगवी आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक श्री. विठोबा चौधरी व प्राथमिक मुख्याध्यापक श्री कल्पेश मावची उपस्थित होते.
शिरपूर तालुक्यातील १४८ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या सूर्यनमस्कार स्पर्धेत सहभागी झाले होते.

सांगवी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनीं तालुकास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेच्या तीनही गटात घवघवीत यश संपादन केले. पहिली ते चौथीच्या गटात हसीना छगन पावरा हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. पाचवी ते सातवीच्या गटात सर्जन जायमल पावरा याने द्वितीय तर शहीद शाहीदास पावरा याने तृतीय क्रमांक पटकाविला. आठवी ते दहावीच्या मुलींच्या गटात सुनिता सुभाराम पावरा प्रथम क्रमांक तर पूजा बलदार पावराने द्वितीय क्रमांक पटकाविला. आठवी ते दहावीच्या मुलांच्या गटात अजय बारकू पावरा याने प्रथम क्रमांक तर विशाल दोहऱ्या वसावे याने द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


लोकनियुक्त सरपंच श्री. कनिलालदादा पावरा मुख्याध्यापक श्री. कल्पेश मावची यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. निता सोनवणे यांनी शबरी सेवा समितीच्या माध्यमातून श्री. प्रमोदजी करंदीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरपूर तालुक्यातील केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला. सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांना आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी नक्कीच लाभदायी ठरेल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री रविंद्र विसावे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शबरी सेवा समितीचे श्री. आकाश पावरा, श्रीमती. जिला पावरा, श्री सूरज सोनवणे तसेच सर्व स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले. सांगवी आश्रमशाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार