मंगरुळेजी! कमालच केली तुम्ही;उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जरंडीत उदगार;

Spread the love

जरंडी, ता.१३.(साईदास पवार)..मंगरुळेजी! कमालच केली तुम्ही असे गौरव उदगार काढले चक्क जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्य कारी अधिकारी शिवराज केंद्रे यांनी जरंडी ग्रामपंचायत च्या ग्रामसेवक सुनील मंगरुळे यांनी जरंडी ला विविध विकास उपक्रम राबवून ग्रामपंचायत अपडेट केली यावेळी हे उदगार उपमुख्यकार्य कारी अधिकारी यांनी विकास कामे पाहून भारावून हे उदगार काढले शुक्रवारी उपमुख्यकार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे विशेष कर वसुली अभियान अंतर्ग जरंडी ग्रामपंचायतला भेट देण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी जरंडी ग्रामपंचायत च्या विविध विशेष उपक्रमाची पाहनी केली यावेळी सरपंच वंदनाबाई पाटील यांनी त्यांचा सत्कार केला

उपमुख्यकार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे यांनी ग्रामपंचायत च्या मोफत गरम पाणी यंत्रणा,माय बाप कक्ष, हुतात्मा स्मारक वृक्ष लागवड, बाजार ओटे,आदी उपक्रम पाहणी करून हुतात्मा स्मारक परिसरातील हिरव्यागार गालिचा पाहून त्यांनी चक्क मंगरुळेजी! कमालच केली तुम्ही असे गौरोउदगार काढून जरंडी ग्रामपंचायतला भरभरून निधी देण्याची घोषणा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे यांनी काढले, हुतात्मा स्मारक परिसरात जरी ग्रामपंचायत च्या वतीने तब्बल पाच हजार वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात आले आहे त्यामुळे हुतात्मा स्मारक चे झालेले वन फॉरेस्ट पाहून त्यांनी चक्क कमाल केल्या चे उदगार काढून जनसुविधा योजनेत जरंडी ला पाच लक्ष रु चे शेड तातडीने मंजूर करून देण्याची घोषणा त्यांनी विकास कामे पाहून केली आहे…

यावेळी सागर सोनवणे प्रकल्प अधिकारी दीपक म्हेत्रे,उपसरपंच संजय पाटील मधुकर पाटील दिलीप पाटील,चंद्रभागाबाई चौधरी, द्वारकाबाई राठोड संजीवन सोनवणे ,अमृत राठोड,बनेखा तडवी,आदींची उपस्थिती होती यावेळी त्यांनी शंभर टक्के दिव्यांगा साठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले त्यांना घरकुल मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांनी जनसुविधा, दिव्यांगा च्या योजना कर वसुली आदींचा आढावा घेतला कर वासुकी अभियानात जरंडी ग्रामपंचायत च्या वतीने नव्वद हजार रु ची वसूली करून जिल्ह्यात अव्वल ठरली असल्याचे त्यांनी सांगितले….

हे पण वाचा

टीम झुंजार