दुचाकीवरुन मित्रासोबत जात असताना डंपरची धडक, जळगावात एसटी कर्मचाऱ्याने जीव गमावला

Spread the love

जामनेर : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगावातील जामनेर शहरात एका डंपरच्या धडकेत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने त्यांच्या मित्रांनी रुग्णालयात एकच गर्दी केली.

जामनेर शहरातील वाकी रोडवरील हरिओम नगरजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निलेश नामदेव बडगुजर (वय ३२ राहणार पाळधी, हल्ली मुक्काम जामनेर) असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली आहे.

एसटी कर्मचारी निलेश नामदेव बडगुजर आणि त्यांचा मित्र नितीन माधव सोनवणे हे दुचाकीवर जात असताना जामनेर शहरातील वाकी रोडवरील हरिओम नगर जवळ जामनेरकडे येणाऱ्या डंपरने त्याच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील निलेश नामदेव बडगुजर याचा जागीच मृत्यू झाला असून नितीन सोनवणे हे जखमी झाले होते.

जखमीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मयत निलेश बडगुजर हे जामनेर एसटी डेपो क्लर्क या पदावर कार्यरत होते. सदर घटनेची माहिती मिळताच जामनेर उपजिल्हा रुग्णालयामध्ये मित्र व नातेवाईकांनी आक्रोश केला. हा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. निलेश बडगुजर यांच्या पक्षात पत्नी व एक मुलगा आहे भाऊ असा परिवार आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार