Bajra Flour For health: तुम्ही जर हिवाळ्यात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे…
Bajra Flour For health: हिवाळा हा खाण्या-पिण्यासाठी खूप चांगला मानला जातो. पण यातही काही समस्या होत असतात. हिवाळ्यातही अनेक आजार डोकं वर काढतात. सर्दी-खोकला तर कॉमन आहे. पण सोबतच आपली इम्युनिटी कमी होत असल्याने काही समस्या होतात. तसेच आपलं पचनतंत्रही योग्यपणे काम करू शकत नाही. अशात आम्ही ही समस्या दूर करण्यासाठी एक उपाय सांगणार आहोत. तुम्ही जर हिवाळ्यात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे…
1) जर तुम्ही हिवाळ्यात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. बाजरीच्या भाकरीने पचनक्रियेत खूप सुधारणा होते. त्याशिवाय अपचन, बद्धकोष्टता आणि पोटदुखीसारख्या समस्याही दूर होतात.
2) जर तुम्हाला बाजरीची भाकरी आवडत नसेल तर किंवा त्याची टेस्ट आवडत नसेल तर भाकरी करताना त्यात हिंग, लसूण आणि काळं मीठ टाका. याने भाकरीची टेस्ट वाढेल आणि लसणातील पोषख तत्वांनी इम्यूनिटीही बूस्ट होईल.
3) तुम्हाला माहीत की, बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं. आयरन कमतरता असणाऱ्या लोकांसाठी बाजरीची भाकरी रामबाण उपाय मानला जातो. याने एनीमियाचा धोकाही कमी होतो.
4) हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, बाजरीची भाकरी हृदयाच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. याने नसांमधील ब्लॉकेज कमी केलं जातं आणि त्यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होतं. तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी राहतो.
5 ) पचनक्रियेशी संबंधित त्रासापासून मुक्तता
फायबरयुक्त असं हे बाजरीचं पीठ ग्लूटेन मुक्त असल्याने आरोग्यास याचा खूप फायदा होतो. बाजरीची भाकरी हिवाळ्यात रोज खाल्ल्यामुळे पोटाशी संबंधित आणि पचनक्रियेशी संबंधित समस्येपासून मुक्तता मिळते. बाजरीची भाकरी पोटाचा विकारापासून सुटण्यासाठी रामबाण उपाय आहे.
6 ) बाजरीची भाकरी खा, वजन कमी करा
ज्यांना वजन कमी करायचे आहेत, त्यांनी सर्वप्रथम जेवणात बाजरीच्या पिठापासून तयार केलेली भाकरी खाल्ली पाहिजे. बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटतं. त्यामुळे आपण जास्त खाणं टाऴतो. तर प्री-बायोटिक बाजरीत असल्याने मधुमेहाच्या रुग्णांनाही डॉक्टर जेवण्यात बाजरी भाकरी खायला सांगतात.
7 ) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत
बाजरी अनेक गुणांनी समृद्ध असून या पिठाचं सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. महत्त्वाचं म्हणजे बाजरीमुळे तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे याचा फायदा किडनी आणि यकृताला होतो.
8) बाजरीच्या पिठात ओमेगा 3 फॅटी ऍसिडयुक्त
ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे शरीरासाठी आवश्यक असून पेशी दुरुस्त महत्त्वाची भूमिका बजावतो. हे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असून ते फक्त अन्नपदार्थांमधून आपण्यास मिळतं त्यामुळे बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला ओमेगा ३ मिळतं. इतर धान्यांपेक्षा बाजरीच्या पिठात सर्वात जास्त ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळतं.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






