लोकल ट्रेनमधून झालेल्या अपघाताच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या आहेत. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वांद्रे- माहिम स्थानकावर १२ वर्षांचा मुलगा लोकलमधून खाली पडला आहे.(A 12-year-old boy fell from a train. Rescued by Mumbai Police)
मात्र सुदैवाने मुलाचे प्राण वाचले आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने मुलाचे प्राण वाचवले आहे. मुलाचे नाव फरहान अन्सारी असं आहे. ६ जानेवारी रोजी ही घटना घडली आहे.
आई-वडिल आणि भावंडासह माहिम मध्ये फरहान रहातो. तो मित्राकडे वांद्रे येथे पुस्तक घेण्यासाठी गेला होता. तिथून परत येत असताना त्याच्या अपघात झाला आहे. वांद्रे- माहिम स्थानकांदरम्यान हा अपघात झाला आहे.
लोकलमधून फरहान खाली पडला खूप वेळ तो तशाच अवस्थेत खाली पडून होता. दरम्यान दुपारी १२.२० च्या सुमारास पोलिस कॉन्सटेबल चेतन तातू यांनी फरहान खाली पडलेल्या अवस्थेत पाहिलं.
फरहानचा डावा पाय मांडीपासून तुटला होता. चेतन यांनी त्याला तातडीने तेथून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. यावेळी फरहान खूप घाबरला होता. मी वाचेन का सर? असं प्रश्न फरहान चेतन यांना विचारत होता
चेतन यांनी फरहानला भाभा रुग्णालयात उपचारसाठी दाखल केलं. यानंतर फरहानच्या मोठ्या भावाला फरहानच्या मित्रांनी सर्व काही सांगितलं. फरहानच्या वडिलांना अपघाताची माहिती मिळताच ते रुग्णालयात पोहोचले.
फरहानच्या वडिलांनी सांगितलं आहे की, मला बघून फरहानला रडू अनावर झालं. पपा मला वाचावा असं फरहान म्हणत होता. मला त्याची अशी अवस्था पाहवत नव्हती.
यानंतर फरहानला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. फरहानला रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्या डाव्या पायाच्या हाडांना आणि ऊतींना जबर दुखापत झाली होती.
दम्यान, सध्या फरहानची प्रकृती स्थिर आहे. अशातच आता फरहानला कृत्रिमरित्या पाय बसवण्यात येणार आहे. डॉक्टरांनी माहिती दिली आहे की, जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात येणार आहे
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






