जळगाव गारठले ; महाबळेश्वर पेक्षाही जळगावचा पारा कमी अंशावर !,

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) :- सध्या देशात सर्वत्र थंडीचे वातावरण आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात थंडीचा कडाका सुरू असून जळगाव जिल्ह्यात ७.८ अंश इतके नोंदले गेल्याने जळगाव गारठले आहे,महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान जळगावचे नोंदवल्या गेल्याने जळगाव करांना थंडीचा सामना करावा लागत आहे.रविवारी सकाळी ७.८ अंश तापमानाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे हे नीचांकी किमान तापमान आहे शिवाय महाबळेश्वरचे किमान तापमान १३ अंश नोंदविण्यात आले.

जळगाव संपूर्ण राज्यात तापणारा जिल्हा म्हणून ओळखले जातो. उन्हाळ्यात या जिल्ह्यात सुर्य आग ओकत असल्याने सर्वाधिक तापमानाची नोंद येथे होण्याचा विक्रम दरवर्षी कायम राहतो. मात्र यंदा जळगाव जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंदी झाली आहे. उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांचा जोर पुन्हा वाढल्याने जळगावचा तापमानाचा पारा ७.८ अंशांवर घसरला आहे. परिणामी राज्यात जळगाव शहराचे सर्वाधिक कमी तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे महाबळेश्वर पेक्षाही जळगाव कुल ठरले आहे. तब्बल २१ वर्षांनंतर जळगावला सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट महाराष्ट्राकडे वळल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे. उत्तर भारतातून येणार्‍या अतिथंड वारे महाराष्ट्रात खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातून शिरत असल्याने या भागातील जिल्ह्यांमधील तापमानात मोठी घट नोंदविण्यात आली आहे.

तापमान कुठे किती जाणून घ्या…..

  • जळगाव ७.८

  • नाशिक ८४

  • औरंगाबाद ८.८

  • पुणे १०.७

  • उस्मानाबाद ११.१

  • बारामती ११.८

  • मालेगाव १२

  • सातारा १२.७

  • अकोला १३.२

  • परभणी १३.५

  • माथेरान १३.६

  • महाबळेश्वर १३.७

  • वाशिम १२.८

  • गोंदिया १२.८

  • मुंबई १३.८

  • वर्धा १३.६

  • नागपूर १४.३

  • गडचिरोली १४.४

  • नांदेड १४.५

  • उदगीर १४.५

  • सांगली १४.९

  • सोलापूर १५.६

  • रत्नागिरी १५.०८

हे वाचलंत का ?

टीम झुंजार