जेव्हा आपण बहुजन हिताय बहुजन सुखाय या वाक्याचे पालन करू तेव्हा आपले जीवन यशस्वी होईल . वक्ते ऍड रवींद्र गजरे.
समतेची शिकवण अंगीकार करा विषमतेचे मूळ आपोआप संपेल – युवा वक्ते सतिष शिंदे.
साकरे ता धरणगाव
साकरे येथे महापुरुषांच्या कार्यास व्याख्यान कार्यक्रम आयोजन करून उजाळा देण्यात आला प्रसंगी महापुरुषांची आपल्या जीवनात महत्वता , बहुजन महानायज व महानायिका यांनी हा समाज जोडण्यासाठी अथक परिश्रम घेतले परंतु आम्ही आज स्वतः च्या डोक्यावर न चालता इतरांच्या डोक्यात काय विचार सुरू आहेत ते स्वीकारून चालतो . महापुरुषांचे विचार केवळ वाचून चालणार नाही तर ते आचरणात किती प्रमाणात आणतात यावर खरे अभिप्रेत कार्य सफल होईल असे प्रतिपादन युवा वक्ते सतिष शिंदे यांनी केले.
तर इतिहास संदर्भात अनेक दाखले उदाहरण देताना छत्रपती शिवराय ते भीमराय यांच्या विचारांचा वसा आम्हाला कसा प्रेरणादायी ठरतो यावर प्रा ऍड रवींद्र गजरे सर यांनी प्रतिपादन करत , तरुणांना , शिक्षण महत्त्व ,व्यसनमुक्ती , महिला सबलीकरण , आदींवर प्रकाश टाकला .
यावेळी युवा वक्ते ऍड रवींद्र गजरे , युवा वक्ते सतिष शिंदे , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष सिराज कुरेशी , निलेश पवार , गौतम गजरे , साकरे गावाचे पोलीस पाटील घनश्याम पाटील , ग्रामपंचायत सदस्य भानुदास पाटील , रोहीदास सोनावणे, गुलाब सोनावणे , श्रावण पानपाटील , व गावातील बहुसंख्य नागरिक ,महिला ,तरुण , ग्रामपंचायत सदस्य ,यांची उपस्थिती होती .सूत्रसंचालन व आभार धनराज सोनवणे यांनी केले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






