जळगाव : – शाळेची फी न भरल्यामुळे ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वर्गाच्या आत प्रवेश करू न देता त्यांना कडाक्याच्या थंडीमध्ये वर्गाच्या बाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव मधील विद्या इंग्लिश स्कूल मध्ये घडला आहे. या घटनेनंतर पालकांनी शाळा प्रशासनावर संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.
करोना काळापासून अनेक कुटुंबांची आर्थिकघडी विस्कटली असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आपल्या पाल्याची फी भरता न आलेल्या पालकांना शाळा चालकांनी चांगलाच मनस्ताप देण्याचा प्रकार सुरु केला असून त्याचाच एक प्रत्यय जळगाव शहरातील विद्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज पाहायला मिळाला आहे.
विद्या इंग्लिश मिडीयमचे इयत्ता सहावी ते दहावीचे विद्यार्थी आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत हजर झाले. मात्र, वर्गात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना फी भरण्यास सांगण्यात आले आणि ज्यांनी फी भरली नाही. त्यांना वर्गात प्रवेश न देता, शाळेच्या प्रांगणात बसवण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






