राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत वाहतूक सुरक्षा बाबत फर्दापूर येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

Spread the love

सॊयगाव दि.१७….(साईदास पवार) फर्दापुर पोलीस ठाण्यात मंगळवारी दि.१७ राष्ट्रीय रक्षा सुरक्षा 2023 निमित्त माननीय पोलीस अधीक्षक श्री मनीष कलवानिया साहेब व माननीय अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार साहेब तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विजयकुमार मराठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फर्दापूर पोलिसांनी रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

दि. 11.ते दि,.17. या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहअंतर्गत मौजे फर्दापूर व अजिंठा लेणी टि पॉइंट येथे वाहतूक सुरक्षा बाबत मार्गदर्शन करून मोटरसायकल चालक यांनी मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा. ट्रिपल सीट कोणालाही बसू देऊ नये किंवा चालवू नये तसेच काळी पिवळी, ऑटो रिक्षा व इतर वाहने यांनी आरटीओ यांनी ठरवून दिलेल्या नियमा प्रमाणे प्रवासी वाहतूक करावी त्यापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये व अपघातास आमंत्रण देऊ नये. वाहने वेगात चालवू नये.

मॉर्निंग वॉक करणा-यांनी पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूचा वापर करावा. रस्ता वाहतुकीचे सर्व नियम पाळण्यात यावे. यापुढे आपल्या 18 वर्षा खालील पाल्यांना वाहने चालविण्यास देऊ नयेत. अन्यथा पोलीस यापुढे नियमित कारवाई करतील व पालकांना नियमाप्रमाणे प्रत्येकी 5000/- रुपये एवढा दंड आकारण्यात येईल. अपघात ठिकाणी तत्काळ मदत करावी. वाहनांना रिफ्लेक्टर बसवावेत. शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने सुस्थितीत असावी त्यांनी वेग मर्यादेची व वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचना देऊन रस्त्यावरील प्रवास सुरक्षितपणे व्हावा यासाठी आवाहन करून रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती केली आहे.

तसेच विविध शाळा व महाविद्यालयातील सहलीसाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमाचे पालन करण्या संदर्भाने जनजागृती करण्यात आलेली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इसमांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात मोटार वाहन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. रस्ता सुरक्षा ही काळाची गरज असून सुरक्षित प्रवास होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार