संत ज्ञानेश्वर महाविद्यालय मध्ये “मराठी भाषा पंधरवडा” उद्घाटन कार्यक्रम संपन्न.

Spread the love

सोयगाव, दि.१८.(साईदास पवार).सोयगाव येथे मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्ताने बुधवारी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातविविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.(दि.१८) उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.या निमित्ताने ‘मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर बोलताना प्रा.स्वामी म्हणाल्या की
“मराठी पदवीव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर शिक्षण क्षेत्राबरोबरच संपादन, प्रुफरीडिंग यांसाख्या विविध ठिकाणी रोजगाराच्या संधी आहेत. प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, आकाशवाणी, जाहिरात, लेखन, ई नियतकालिके, दूरदर्शन मालिकांसाठी लेखन त्याचप्रमाणे पटकथा लेखन, संवाद लेखन आदी अनेक क्षेत्रात करिअरच्या वाटा उपलब्ध आहेत.”

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी केला. हे म्हणाले की,” आपण आपले व्यवहार मराठी भाषेतूनच केले पाहिजे त्यासाठी आपण आग्रही असले पाहिजे. मराठी भाषेतून संवाद साधण्यासाठी भाषा शुद्ध ,अशुद्ध नाही पाहिले तरी चालते मात्र लिहिताना मात्र आपण शुद्धलेखनाची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे ते भाषा टिकण्यासाठी आवश्यक आहे.

उप-प्राचार्य डॉ.रावसाहेब बारोटे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दिलीप बिरुटे, प्रमुख मराठी विभाग यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. रमेश औताडे यांनी व आभार डॉ.साईराज तडवी यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक- शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार