सोयगाव- शेंदुणीं रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे, दर्जेदार काम करण्याची मागणी, येत्या प्रजासत्ताक दिनी ग्रामस्थांचा उपोषणाचा ईशारा

Spread the love


सोयगाव,दि.१९(साईदास पवार) मराठवाडा – खांदेशला जोडणारा सोयगाव – शेंदुर्णी रस्त्याचे काम निकृष्ठदर्जाचे होत असून रस्त्यांवरील डांबरासह संबंधित अभियंते सुद्धा गायब झाल्याने ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने सुरू आहे. यात शासनाचे लाखो रुपयांना ठेकेदार चुना लावतआहे.सध्या धीम्या गतीने सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारण्यात येऊन ईस्टमेंट प्रमाणे करण्याची मागणी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाममंत्री महाराष्ट्र व कार्यकारी अभियंता औरंगाबाद यांच्याकडे केली आहे.नसता येत्या प्रजासत्ताक दिनी उपोषण।करण्याचा ईशारा प्रशासनाला निवेदनात देण्यात आला आहे.

निकृष्ट प्रतीचे डांबर वापरल्याने हा रस्ता उखडून रस्त्यारस्त्यावर चुरी साचते. कामे देताना प्रशासनाने गुणवत्तेत कुठलीच तडजोड करायला नको. वेळोवेळी गुणवत्तेची तपासणी व्हायला हवी. दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. डांबर कमी वापरले तर गिट्टी आणि डांबराची पकड कमकुवत होते आणि रस्ता लवकर उखडतो.डांबरात भेसळ करण्याचे प्रकारही होत आहेत. यात जळलेले ऑइल टाकल्या गेल्याने गुणवत्ता कमी होत आहे.संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मराठवाडा – खांदेश ला जोडणारा रस्ता चांगल्या प्रतीचा करावा व प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

प्रशासनाने जबाबदार अधिकारी कामाच्या ठिकाणी नियुक्त करून कामे नियमानुसार व गुणवत्ते नुसार करावे अशी मागणी सोयगाव येथील समाजसेवक महेश मानकर, मंगेश सोहनी,दिपक पाटील, सुरेश मनगटे, सुभाष सोहनी व ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हाधिकरी औरंगाबाद, कार्यकारी अभियंता औरंगाबाद, तहसीलदार सोयगाव व पोलीस निरीक्षक सोयगाव यांना देण्यात आल्या आहेत.

चौकट :-
गिट्टीला पकडून ठेवण्याची क्षमता डांबरात असते. योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रतीचे डांबर वापरून रस्ते तयार केले तर ते वर्षानुवर्षे टिकतात. मात्र सोयगाव – शेंदुर्णी रस्त्याचे ४ ते ५ महिन्यात तीन तेरा वाजतील.

हे पण वाचा

टीम झुंजार