जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
योग्यप्रकारे आकलन करू शकाल. आपले विचार तरलपणे मांडाल. जुगाराची आवड पूर्ण केली जाईल. मुलांच्या सहवासात रमाल. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल.
वृषभ :-
तुमच्या मताचा आदर केला जाईल. घरातील कामात अधिक लक्ष घालावे. तुमचा रुबाब राहील. काहीवेळा माघार घ्यावी लागेल. शिस्तीचा बडगा करू नका.
मिथुन :-
मजेत प्रवास कराल. हातात काही नवीन गोष्टी येतील. सढळपणे इतरांना मदत कराल. गंभीरपणे विचार कराल. वैचारिक प्रौढता दाखवाल.
कर्क :-
आपल्याच मतावर आग्रही राहाल. आवडी-निवडीबाबत ठाम भूमिका घ्याल. गोड बोलण्यावर भर द्याल. दिवस घरातील कामात व्यतीत होईल. जोडीदाराचा विचार जाणून घ्याल.
सिंह :-
तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. सर्वांशी आदराने वागाल. वागण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल. भावनाशीलतेने विचार कराल. जोडीदाराचे प्रेम सौख्य वाढेल.
कन्या :-
लिखाणात मन रमवाल. बुद्धीवादी विचार कराल. तुमच्यातील धाडस वाढेल. स्वबळावर विश्वास ठेवावा. स्वभावात काहीसा कठोरपणा येईल.
तूळ :-
आर्थिक जबाबदारी वाढेल. गोष्टींची उपयुक्तता लक्षात घ्यावी. अनाठायी होणार खर्च टाळावा. अधिकारात वाढ संभवते. तिखट पदार्थ चाखाल.
वृश्चिक :-
ऊर्जेने कामे हाती घ्याल. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. काही गोष्टीत विरोध होऊ शकतो. कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्याल. स्नायू धरणे यांसारखे त्रास जाणवतील.
धनू :-
नातलग भेटतील. इतरांचे कौतुक कराल. उत्कृष्ट काव्यस्फूर्ती लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण कराल. आनंददायी दृष्टकोन ठेवाल.
मकर :-
गायन कलेला चांगला वाव मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. महिला दागदागिने खरेदी करतील. सामाजिक कार्यात हातभार लावाल. सर्वांशी गोडीने वागाल.
कुंभ :-
फॅशनची हौस पूर्ण करता येईल. प्रत्येक गोष्टींचा रसास्वाद घ्याल. उत्तम व्यक्तिमत्वाची छाप पडेल. बोलण्यात माधुर्य ठेवाल. चांगले विवाह सुख लाभेल.
मीन :-
प्रवासात काळजी घ्यावी. कामाची तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. उपासनेला बळ मिळेल. स्वकष्टावर कामे करण्याकडे कल राहील. वरिष्ठांची मर्जी राखावी.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






