एरंडोल – येथे दादासाहेब दि. शं. पाटील महाविद्यालय, येथे आत्मनिर्भर युवती अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन बेंडाळे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस. एस. राणे सरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब अमित पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एन. ए. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. हेमंत पाटील, युवती सभा सचिव डॉ. स्वाती शेलार, युवती सभा सदस्या डॉ. मीना काळे, डॉ. रेखा साळुंखे, डॉ. शर्मिला गाडगे, डॉ. सविता पाटील आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक व मुख्य अतिथी डॉ. एस. एस. राणे यांनी सागितले की, प्रत्येक मुलीला निसर्गाने जन्मत: कौशल्य दिलेले असते. त्याचा पुरेपुर वापर मुलींनी केला पाहिजे. आजच्या या काळात मुलींमध्ये पैसे कमवण्यासोबतच वैचारिक आत्मनिर्भरता देखील आली पाहिजे. स्वयंरोजगारासाठी लागणारा स्वतंत्र दृष्टिकोन, स्वतंत्र विचार, सर्जनशीलता, आत्मविश्वास अतः दृष्टि यासारखे व्यक्तित्व गुण विद्यार्थिनींनी आत्मसात केली पाहिजे. विविध उघुउद्योग विद्यार्थिनी कसे करू शकतात हे त्यांनी बेंडाळे महाविद्यालयामध्ये विविध योजनांची माहिती देऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एन. ए. पाटील यांनी अभियानासाठी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना म्हटले की, देश आत्मनिर्भर बनविण्यासाठी युवती आत्मनिर्भर बनली पाहिजे. विविध शासकीय योजनांचा मुलींनी लाभ घेतला पाहिजे. स्वतःला अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी विद्यार्थिनींनी आपल्या ज्ञानाचा व्यासंग वाढवला पाहिजे.अध्यक्षीय भाषणात दादासाहेब अमित पाटील यांनी म्हटले की, विद्यापीठाने जो आत्मनिर्भर युवती अभियानाचा उपक्रम राबविला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम असून याचा लाभ युवतींनी नक्की घेतला पाहिजे.
महाविद्यालयाने ज्या सोयी-सुविधा मुलींना उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचा वापर केला पाहिजे, युवती सभा मंचाचे त्यांनी कौतुक केले व आत्मनिर्भर युवती अभियानाला शुभेच्छा दिल्या.सदर प्रसंगी डॉ. स्वामी शेलार यांनी प्रास्ताविक केले तसेच पायल कलाल व देवयानी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, अश्विनी पाटील, गायत्री पाटील यांनी स्वागतगीत व ईशस्तवन गायले व निकिता सैंदाणे हिने आभार प्रदर्शन केले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






