धरणगाव : सध्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका खेडेगावात बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीसोबत घाणेरडे कृत्य केलं आहे. आरोपी बापाने आपल्या १७ वर्षीय मुलीसोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एका खेडेगावात बापानेच आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी काल बुधवारी धरणगाव पोलीस ठाण्यात अत्याचार करणाऱ्या बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिची आई व वडिलांसोबत वास्तव्यास आहे. मुलीचे तिच्या वडिलांनी काही महिन्यांपूर्वी तिच्या मनाविरुद्ध एका तरुणासोबत विवाह करून दिला. लग्नानंतर मुलीला तिचा पती हा दारू पिऊन भांडण तसेच मारहाण करत असल्याने त्रासाला कंटाळून सात ते आठ महिन्यानंतर अल्पवयीन मुलगी ही दुसऱ्या राज्यात पळून गेली होती.
पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला परत आणले होते. त्यानंतर तिला बालकल्याण समिती जळगाव येथे दाखल केले होते. या ठिकाणी एक ते दोन महिने राहिल्यानंतर मुलगी पुन्हा तिच्या आई वडिलांसोबत राहण्यास गावी गेली. यादरम्यान दोन तीन महिने उलटल्यानंतर मुलीवर तिच्या बापानेच जबरदस्तीने मारहाण करत अत्याचार करायला सुरुवात केली.
पाच ते सहा महिन्यापर्यंत अश्लिल व्हिडिओ दाखवून बापाने मुलीवर अत्याचार केले. याला विरोध केल्यानंतर बाप मुलीला मारहाण करत असे. या घाणेरड्या प्रकाराला कंटाळून मुलीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर बुधवारी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ करत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






