जळगाव– राज्याच्या ग्रामीण विकासात मोलाचे योगदान असणाऱ्या सरपंचांना संघटित करून शासन आणि गावकारभारी यांच्यातील दुवा म्हणून गेल्या १० वर्षांपासून राज्यभर प्रभावीपणे काम करणाऱ्या पंचायत राज विकास मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या राज्य सरचिटणीस पदी ग्रामगौरव प्रकाशनाचे समूह संपादक आणि ग्रामीण विषयावरील विश्लेषक विवेक ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका पत्रान्वये ही नियुक्ती जाहीर केली.श्री.ठाकरे हे मूळ रावेर तालुक्यातील निंभोरा गावाचे माजी उपसरपंच असून सद्या पुण्यातून ग्रामविकासाच्या योजनांसाठी कार्यरत ग्रामगौरव मासिक आणि ग्राम टीव्ही अशा डिजिटल मिडियाचे समूह संपादक म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या नियुक्तीचे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे,जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,सरचिटणीस पुरूजित चौधरी,राज्य संघटक गणेश पुजारी,रावेर तालुकाध्यक्ष प्रमोद चौधरी राज्य संपर्क प्रमुख सचिन जगताप आदींनी स्वागत केले आहे.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






