कल्याने खु येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या .

Spread the love

कल्याने खु ता धरणगाव –
कल्याने खु येथे 20 जानेवारी 2023 रोजी सकाळी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली . सुनील धरमसिंग पाटील – वय 50 असे मृत व्यक्ती चे नाव असून घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. दरम्यान त्यांचे किराणा दुकान होते सकाळी ग्राहक वस्तू घेण्यासाठी आल्याने दुकानात कोणीही नव्हते .

त्यानंतर पत्नीने इकडे तिकडे पाहिले असता , बाजूला पत्र्याच्या शेड ( खळ्यात ) त्यांनी गळफास घेतलेला आढळला. ते स्वभाव ने अत्यंत शांत होते . परंतु स्वतः ची जीवन यात्रा संपवल्याने गावकऱ्यांचे मन अगदी सुन्न झाले होते. मृत सुनील धरमसिंग पाटील यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली ,एक मुलगा , असा परिवार आहे. त्यांच्यावर संध्याकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार