जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मोठ्या लोकांत उठबस वाढेल. जवळचे मित्र भेटतील. उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवेल. कामाची धावपळ वाढेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
वृषभ :-
बोलण्यातून कामे मिळवाल. इतरांची मने जिंकून घेता येतील. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यापरिवर्गाला दिवस चांगला जाईल.
मिथुन :-
कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. लहान प्रवास कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. मनाची विशालता दाखवाल. धार्मिक भावना जोपासाल.
कर्क :-
आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदारा बरोबर गप्पा-गोष्टी कराल. पैज जिंकता येईल. कलेला पोषक वातावरण मिळेल.
सिंह :-
मानसिक व्यग्रता जाणवेल. आपला ठसा उमटवाल. घरातील गोष्टी शांततेत हाताळाव्यात. वाहन विषयक कामे पार पडतील. जमिनीच्या कामात लक्ष घालाल.
कन्या :-
फार काळजी करू नये. काही गोष्टी पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. ऐशारामाच्या वस्तूंची आवड निर्माण होईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सामाजिक बांधिलकी जपाल.
तूळ :-
मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळच्या मित्रमंडळींशी गप्पांमध्ये रमून जाल. नवीन स्नेहसंबंध जोडले जातील. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. आत्मविश्वास वाढीस लागेल.
वृश्चिक :-
प्रत्येक गोष्टीत समाधान मानाल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. आनंदाने एकमेकांना मदत कराल. घरात टापटीप ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
धनू :-
कौटुंबिक जबाबदारी वाढेल. गोड बोलून कामे मिळवाल. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. फोटोग्राफीची हौस पूर्ण करता येईल.
मकर :-
श्रम वाढतील. आपले विचार उत्कृष्ठपणे मांडाल. हसत हसत कामे पूर्ण कराल. बौद्धिक चलाखी वापराल. योग्य तर्क वापराल.
कुंभ :-
झोपेची तक्रार जाणवेल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. मानापमानाच्या गोष्टी फार मनावर घेऊ नयेत. आर्थिक गुंतवणूक सावधगिरीने करावी. काही कामे अडकून पडतील.
मीन :-
लहानांशी मैत्री कराल. मानाने कामे कराल. चांगला आर्थिक लाभ होईल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. योग्य कागदपत्रे सादर करावीत.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






