गौरवकुमार पाटील / अमळनेर
देशाचे मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून “परीक्षा पे चर्चा” हा कार्यक्रम एक भारत श्रेष्ठ भारत यातून राबविण्यात येत आहे. तरी देशातील मुलांना त्याच्या कडील कौशल्य व विविध गुणांना वाव मिळण्यासाठी खालील विषयांवर भारतीय जनता पार्टी तर्फे इ.९ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा राबविण्यात येणार आहे. तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक व बक्षीस तसेच उतेजानार्थ १० विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व बक्षीस तर सभाभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
चित्रकला स्पर्धेचे विषय –
१. एक भारत श्रेष्ठ भारत
२. जी- २० जागतिक विश्वगुरु बनविण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल.
३. आजादी का अमृत महोत्सव
४. सर्जिकल ट्राईक
५. करोना लसीकरन मध्ये भारत नं. १
६. पंतप्रधानाच्या जन सेवेच्या विविध योजना.
७. स्वच्छ भारत अभियान
८. आत्म निर्भय भारत
९. अंतरराष्ट्रीय योग दिन.
१०. बेटी बचाव बेटी पढाव
११. चुलीच्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला – मोदींचा संवेदनशील निर्णय.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी (फक्त इ.९ ते १२ वी) नाव नोंदणी online पध्दतीने www.parikshapecharcha.online या लिंकवर करायची आहे. सदर परीक्षा रावेर लोकसभा क्षेत्रातील चोपडा, यावल, रावेर, भुसावळ मुक्ताईनगर, बोदवड व जामनेर अशा वेगवेगळ्या तालुक्यात होणार आहे.
परीक्षेचे वेळापत्रक –
रावेर – दि.२१/०१/२०२३, वेळ – स.१०.०० वा, ठिकाण – यशवंत विद्यालय, रावेर, संपर्क- श्री.महेंद्र पाटील मो.९६३७९१७०७१
यावल – दि.२१/०१/२०२३, वेळ – स.१०.०० वा, ठिकाण – माध्यमिक कन्या शाळा, यावल संपर्क – श्री.सागर कोळी मो.९९२३७२०२५८
चोपडा – दि.२१/०१/२०२३, वेळ – दु.०२.०० वा, ठिकाण – स्वामी विवेकानंद महाविद्यालय, चोपडा संपर्क श्री.प्रकाश पाटील मो.९७६४०३०३०९
मुक्ताईनगर – दि.२२/०१/२०२३, वेळ – स.१०.०० वा, ठिकाण – गोदावरी मंगल कार्यालय, मुक्ताईनगर, संपर्क – श्री.अंकुश चौधरी मो.८९९९४८७५५०
बोदवड – दि.२२/०१/२०२३, वेळ – स.१०.०० वा, ठिकाण -न.ह.रांका हायस्कूल, बोदवड संपर्क – श्री.विक्रम वरकड मो.८००७००२२६९
भुसावळ – दि.२५/०१/२०२३, वेळ – स.११.०० वा, ठिकाण – अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ संपर्क – श्री.अनिरुद्ध कुलकर्णी मो.९२७३०३५१९८
जामनेर – दि.२४/०१/२०२३, वेळ – स.०८.०० वा, ठिकाण -न्यू इंग्लीश स्कूल, जामनेर संपर्क – श्री.किरण पाटील मो.९४२३४९११५५






