पिंप्री खु . प्रतिनिधी / सतिष शिंदे
धरणगाव :- बस स्टॅण्ड वर अमळनेर हुन जळगाव जाणारी बस क्र .एम एच 06 एस 8693 बसला दूध घेऊन जाणाऱ्या ट्रक एम एच 19 झेड 3053 ने मागून धडक दिली .हा ट्रक धुळे येथून दूध घेऊन जळगाव येथे जात होता. दरम्यान बस ही मुख्य रस्त्यावर स्टॅण्ड वर थांबली होती .

तसेच प्रवासी चढ उतार करत होते . दूध घेऊन जाणारा ट्रक हा धरणगाव कडून जळगाव कडे जात असताना बस ला जोरदार धडक दिली यात बसचे मागील बाजूचे इंडिकेटर , फायबर बंफर तुटले . सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. घटना घडताच चालक आयस अन्सारी व वाहक सविता पाटील यांनी अमळनेर डेपो ला ए डब्ल्यू एस प्रमोद बाविस्कर यांना माहिती दिली. महाराष्ट्र न्युज 21 ला शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पुढील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ यांना संपर्क करण्याचे काम सुरू होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






