धक्कादायक फेसबुकवर झाली ओळख, लग्नाचे आमिष दाखवून परराज्यातील महिलेवर वेळोवेळी केला अत्याचार, भडगावच्या तरुणावर गुन्हा दाखल

Spread the love

भडगांव :- महिलांवर होणारे अत्याचाराच्या वाढतच असून अशातच जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. फेसबुकच्या माध्यमातून ओळखी निर्माण करत लग्नाचे आमिष दाखवून भडगावच्या तरुणाने परराज्यातील महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत महिला गर्भवती राहिल्याचे समजताच संशयित आरोपीने पळ काढला.

सागर भिमा वैद्य असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडगाव शहरात राहणाऱ्या सागर भिमा वैद्य याने गुजरात राज्यातील एका २६ वर्षीय महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. दोघांचे मैत्रीत रूपांतर झाले. यानंतर सागर वैद्य याने महिलेला नाशिक येथे बोलावून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.

या अत्याचारात महिला गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, महिला गरोदर असल्याचे समजताचा संशयित आरोपी सागर हा पळून गेला. महिलेने अखेर भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून सागर विरोधात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे..

टीम झुंजार