आजचे राशीभविष्य, ( सोमवार २३ जानेवारी २०२३ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

प्रेमभावना वाढीस लागेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. व्यापार विस्ताराचा विचार कराल. आपले महत्व इतरांना पट‍वून द्याल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

वृषभ :-

मनातील आकांक्षा पूर्ण होतील. स्त्रीवर्गाशी मैत्री कराल. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. चारचौघात तुमचे कौतुक होईल. आर्थिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन :-

औद्योगिक वातावरण चांगले राहील. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. सहृदयतेने वागणे ठेवाल. मित्रांच्या ओळखीने कामे केली जातील.

कर्क :-

मनाची विशालता दाखवाल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल.

सिंह :-

जवळच्या सहलीचा आनंद घ्याल. मित्रमंडळी जमवाल. रेस, सट्टा यांतून लाभ होईल. सासुरवाडीची मदत मिळेल. काही कामे कमी श्रमात पार पडतील.

कन्या :-

उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. आवडी-निवडी वर भर द्याल. एकमेकांची बाजू उत्तमरीत्या समजून घ्याल. पत्नीच्या शांत स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

तूळ :-

लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. आळशीपणा करू नका. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल. ऐषारामाच्या गोष्टींची आवड निर्माण होईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

वृश्चिक :-

मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. मित्र परिवारात भर पडेल. आधुनिक विचार मांडाल. हातून चांगले लिखाण होईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.

धनू :-

मानसिक समाधान लाभेल. मदत करण्याचा आनंद कमवाल. घरात टापटीपपणा ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.

मकर :-

भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण करता येईल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. निसर्गाच्या सहवासात रमून जाल.

कुंभ :-

कामाचा व्याप वाढू शकतो. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ जाईल. आवडत्या वस्तु खरेदी कराल. एकलकोंडेपणा बाजूला ठेवावा. गुरूजनांचा सहवास लाभेल.

मीन :-

मानसिक चंचलता जाणवेल. अचानक धनलाभ संभवतो. सर्वांशी आपलेपणाने वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीकडे कल राहील.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार