गौरवकुमार पाटील / अमळनेर
अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाला २ रुपये व ३ रुपये किलोने दिले जाणारे स्वस्त धान्य दुकानात मिळणारे धान्य वर्षभर निशुल्क / मोफत दिले जाणार आहे , या बाबत अमळनेरचे तहसीलदार यांनी प्रेमनोट प्रसिद्धीस दिली आहे ,त्यात त्यांनी म्हटलं आहे की –
१) दिनांक १ जानेवारी २०२३ पासून अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना दिले जाणारे धान्य पूर्ण वर्षभर मोफत/ निशुल्क दिले जाईल ,
२) हे धान्य देतांना किंवा वितरण करतांना त्याची स्वतंत्र पावती दिली जाईल ,
३) या धान्याची उचल करतांना लाभार्थ्यांचे स्वतंत्र बायोमेट्रिक प्रमाणीकरण ( ई-पास मशीनवर वेगळ्याने अंगठा द्यावा लागेल ) ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल
४) सर्व लाभार्थ्यांना यापुढे वर्षभर मिळणाऱ्या धान्याचे पैसे द्यावे लागणार नाहीत असे प्रसिद्धी पत्रक अमळनेरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिनांक २० जानेवारी २०२३रोजच्या पत्र क्रमांक पुरवठा / कावी / 29/ 2023 अन्वये जनतेला कळविले आहे
जनहितार्थ
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






