पाडळसरे धरणाच्या जलसाठ्यात सात्री ग्रामस्थ २६ जानेवारी रोजी घेणार जलसमाधी
जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन दिला इशारा, प्रशासनाने कार्यवाहीचे दिले आश्वासन
प्रतिनिधी | अमळनेर
स्वातंत्र्य पूर्व काळापासून आज पर्यंत सात्री गावाला पर्यायी रस्ताच नसल्याने दोन पावसाळ्यात पूरस्थितीमुळे प्रकृती गंभीर होऊन आठ वर्षीय बालिका व ५० वर्षीय उषाबाईला जीव गमवावा लागला ,एकीचा मृतदेह थेट प्रांत कार्यालयात नेऊन ग्रामस्थांनी दाद मागितली तरी दोन वर्षांपासून कुंभकर्णि झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने व डोळेझाक करणाऱ्या लोकप्रतिनिधीमुळे पर्यायी रस्त्याचा प्रश्नासह ,भूखंड वाटप , गृहसंपादन ,पुनर्वसनाचे प्रश्न सुटत नसल्याने व्यथित झालेल्या सात्री ग्रामस्थांनी येत्या २६ जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनी पाडळसरे धरणस्थळी असलेल्या जलसाठ्यात जलसमाधी घेण्याचे ठरवले असून याबाबत सात्रीचे माजी सरपंच तथा पुनर्वसन समितीचे सदस्य महेंद्र बोरसे यांनी लेखी निवेदनात विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावे म्हणून लेखी पत्र अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे , यामुळे प्रशासनाची चक्रे गती घेतील असा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केला .नाही तर जलसमाधी आंदोलनासाठी ग्रामस्थांनी तयारी सुरू केली आहे.
आधीच विविध समस्यांनीग्रस्त ग्रामस्थांना पाडळसरे धरणामुळे विस्थापित व्हावे लागनार आहे, मात्र ना पर्यायी रस्ता मिळत,ना पुनर्वसन,ना भूसंपादन,ना भूखंड वाटप ,ना गृहसंपादन,ना सुविधा ? ,यातच भर म्हणून पावसाळ्यात चार महिने गावाचा पूर्ण तालुक्याशी संपर्क तुटतो , यामुळे शेतीला लागणारी खते , जीवनावश्यक वस्तू , आरोग्यासाठी प्राथमिक सुविधा आदींची पूर्व तयारी कर्ज काढून होईना ,करून ठेवावी लागते ,
या समस्या स्वातंत्रपूर्व काळापासून चालत आलेल्या आहेत तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करून ग्रामस्थांच्या भावनांशी खेळत वेळ मारून नेते म्हणून व्यथित सात्री ग्रामस्थांनी गावाच्या पर्यायी रस्त्याला गती मिळत नाही व सुविधा न मिळाल्याने जीव गमवावा लागलेय दोन व्यक्तींना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत मिळण्यास दिरंगाई होत असल्याने त्यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारी रोजी प्रजाकसत्ता दिनी पाडळसरे तापी प्रकल्पाच्या जल साठयात ग्रामस्थांना सोबत जल समाधी घेण्याचा इशारा सरपंच महेंद्र शालिग्राम बोरसे यांनी दिनांक १९ रोजी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
सरपंच बोरसे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने आश्वासन देऊनही अमळनेर तालुक्यातील सात्री गावाच्या पर्यायी रस्त्याला गती मिळत नसल्याने. गृह संपादन प्रस्ताव क्र. २८७/२०१८ सात्री गावठाण संपादनाच्या कामाला गती न मिळता रखडले आहे. पुरपरिस्थीत पर्यायी रस्ता नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने मयतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतुन अद्यापही सहायता निधी मिळालेला नाही. तसेच पुर्नवसन गावठाण मधील भूखंड वाटप बाबत शासन स्तरावर प्रलंबीत असलेल्या प्रस्तावाला मंजुर मिळत नाही. त्यामुळे आम्ही ग्रामस्थ व्यस्थीत होवून दि. २६ रोजी प्रजाकसत्ता दिनी पाडळसरे धरणाच्या जल साठयात ग्रामस्थांना सोबत घेवून जल समाधी घेत आहोत. याची गांर्भियाने दखल घेवून त्वरीत उचित कारवाई करण्यात यावी, अन्यथा याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल असा इशारा दिला आहे.
प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
दरम्यान, सरपंच महेंद्र शालिग्राम बोरसे यांनी निवेदन दिल्यानंतर ते अपर जिल्हाधिकारी यांनी स्विकारले. त्यांनी निवेदन घेऊन एक तास सकारात्मक चर्चा देखील केली. त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले, अशी माहिती सरपंच बोरसे यांनी दिली.






