अमळनेर | प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या निम येथील वीट भट्टीसाठी ग्रामपंचायत कडून ना हरकत दाखल देण्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निम येथील ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील राहणार सुरभी कॉलनी अमळनेर यास रंगेहाथ पकडून अटक केली होती , त्यास दिनांक २४ रोजी अमळनेर येथील न्यायालयात दुपारी हजर केले असता जिल्हा न्यायमूर्ती एस बी गायधनी यांनी तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे ,
याबाबत सरकारी वकील किशोर बागुल व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी युक्तिवाद केला , याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मारवड पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला होता.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






