जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मानसिक स्थैर्य जपावे. घरातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले जातील. मनातील इच्छा पूर्ण होतील.
वृषभ :-
जोडीदाराविषयीचे गैरसमज मनातून काढून टाकावेत. भागिदारीतून लाभ संभवतो. कामात चलबिचलता आड येऊ शकते. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील. वाहनविषयक कामे पार पडतील.
मिथुन :-
वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्यावे. आपला मान जपण्याचा प्रयत्न करावा. मनातील निराशा दूर सारण्याचा प्रयत्न करावा. काहीसा मानसिक ताण जाणवेल. कामातून आनंद शोधावा.
कर्क :-
मुलांच्या आनंदात रमून जाल. नवीन विषयात रुची दाखवाल. करमणुकीचे कार्यक्रम पहायला जाल. भावंडांना मदत कराल. गुरुकृपेचा लाभ घ्यावा.
सिंह :-
घरातील गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. दिवसभर कामात गुंतून राहाल. टापटिपीकडे विशेष लक्ष द्याल. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जमिनीच्या कामात रस घ्याल.
कन्या :-
जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनाला बहर येईल.
तूळ :-
आवडी-निवडीबाबत दक्ष राहाल. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. हातापायाला किरकोळ इजा संभवते. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका.
वृश्चिक :-
दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. तुमचा मान वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. खर्चाला नवीन वाटा फुटू शकतात. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.
धनू :-
संयम राखणे गरजेचे ठरेल. घाईने कोणतेही काम करू नका. कौटुंबिक समस्यांकडे अधिक लक्ष द्यावे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. थोडे धाडस दाखवावे लागेल.
मकर :-
संयम सोडून चालणार नाही. नवीन गोष्टींची जबाबदारी वाढू शकते. सामाजिक वादात पडू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. काही खर्च अचानक येवू शकतात.
कुंभ :-
फार विचार करू नयेत. कामाचा ताण जाणवेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. योग्य नियोजनावर भर द्यावा.
मीन :-
तोंडात साखर ठेवून बोलाल. मैत्रीचे संबंध सुधारतील. मनाजोगी खरेदी करता येईल. कामाच्या ठिकाणी बदलीचे वारे वाहू लागतील. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






