चाळीस वर्षे तिकिटं खरेदी केली… 88 व्या वर्षी 5 कोटींची लॉटरी लागली

Spread the love

मोहाली :- पंजाबच्या मोहालीमधील डेरा बस्सीच्या जवळ त्रिवेदी कँपात राहणाऱ्या महंत द्वारका दास यांचं वय ८८ वर्षे आहे. त्यांनी तब्बल पाच कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. त्यामुळे त्यांचं कुटुंब आणि परिसरात आनंदाचं वातावरण आहे.लॉटरीमध्ये मिळणारी रक्कम द्वारका दास कशा पद्धतीने खर्च करणार, याबद्दल त्यांनी माहिती दिलीय. द्वारका दास हे तब्बल ४० वर्षे सलग लॉटरीचं तिकीट खरेदी करत होते.

आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचं नशीब उजळलं आहे.द्वारका दास हे गावातल्या एका मंदिरामध्ये महंत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी जीरकपूरमधून बंपर तिकीट खरेदी केलं होतं. त्यांची दोन्ही मुलं मुकेश आणि नरिंदर यांनी सांगितलं की, लॉटरीतून मिळालेल्या पैशांबाबत वडील जो निर्णय घेतील तो आम्हांला मंजूर असेल. सध्या आमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे.लॉटरी लागल्यानंतर द्वारका दास यांनी सांगितलं

की, मी या पैशांचे ती हिस्से करणार आहे. दोन वाट्यांमध्ये दोन्ही मुलं आणि एक वाटा मंदिरावर खर्च करणार आहे. मी पूर्ण आयुष्य कष्ट करुन कुटुंबाला सांभाळलं आहे, त्यामुळे मला या पैशांचं फारकाही अप्रूप नाही.द्वारका दास यांनी पुढे सांगितलं की, परमेश्वराने सर्वांना करोडपती बनवावं. मी ३५-४० वर्षांपासून लॉटरी तिकीट खरेदी करत आलोय. परंतु आताकुठे नशीब उजळलं आहे. महंत दास यांचा मुलगा नरेंद्र कुमार हा ऑटो चालक आहे

हे पण वाचा

टीम झुंजार