Viral Video – मगरीचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. ज्यात मगर सिंह, वाघ अशा प्राण्यांचीही शिकार करताना दिसते. पण कधी कोणत्या मगरीने कुणाला वाचवल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? असं शक्यच नाही. असंच तुम्ही म्हणाल. पण पाहूनही विश्वास बसणार नाही, असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. खतरनाक मगरीचं हळवं रूपही पाहायला मिळालं आहे.तुम्हाला माकड आणि मगरीची गोष्ट माहिती असेलच. ज्यात माकड मगरीच्या पाठीवरून बसून नदी पार करतं.
पण या गोष्टीतही मगरीचा गोड गोड बोलून माकडाची शिकार करण्याचा डाव असतो. पण माकडाच्या हुशारीमुळे तो वाचतो. मग प्रत्यक्षात मगरीच्या जबड्यात माणूस लागला तर… पण या व्हिडीओत मात्र आपल्या कल्पनेपलीकडील घडलं. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पाण्यात बुडालेल्या मुलाला पाठीवर ठेवून एक विशाल मगर दिसते. ती त्याला माणसांकडे सोपवते. इंडोनियामधील मगरी असलेल्या नदीत त्या कुटुंबाला आपला हा मुलगा सापडला नव्हता.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक मगर नदीतून किनाऱ्यावर येताना दिसते आहे. ती एकटी नाही तर तिच्या पाठीवर काहीतरी आहे. तुम्ही नीट पाहिलं तर तिच्या पाठीवर एक मुलगा आहे. आपल्या पाठीवर मुलाला ठेवून मगर नदीकिनाऱ्याजवळ येताना दिसते. एका बोटीजवळ ती पोहोचत पोहोचत येते. बोटीवरील लोक त्या मुलालाा उचलतात. त्यानंतर मगर तिथून लगेच माघारी फिरते.फक्त 53 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणी याला अविश्वसनीय म्हटलं आहे तर कुणी चमत्कार. एका युझरने तर देव स्वत: या रूपात आल्याचं म्हटलं आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






