अपघात! फोटोग्राफीचे काम आपटून उत्राण येथे घरी येत असताना कार नाल्यात कोसळल्याने 40 वर्षीय युवकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू.

Spread the love

झुंजार l प्रतिनिधी

एरंडोल :- तालुक्यातील उत्राण येथील दामू वामन भोई यांचा एकुलता एक मुलगा कृष्णा भोई हा फोटोग्राफी कामासाठी ,नाशिक येथे गेला ,असताना तो काल रात्री ,आपले फोटोग्राफीचे काम आपटून मित्रांसोबत ,स्विफ्ट डिझायर गाडीनेआपल्या गावी उत्राण येथे येत असताना ,मालेगाव चाळीसगाव हायवेवर ,साकुर फाट्याजवळ गाडीचा नाल्याचा कठड्याला धक्का लागल्यामुळे,रात्री अंदाजे दोन ते अडीच दरम्यान गाडी नाल्या मध्ये जाऊन कोसळली,

व कृष्णा उर्फ गोकुळ धनराळे( भोई ) याचा ,मालेगाव येथे उपचारासाठी नेत असताना निधन झाले त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना ,चाळीसगाव येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे कृष्णा हा घरातील अत्यंत मनमिळावु स्वभाव असलेला व्यक्ती होता,एकुलताएक असल्यामुळे ,आई-वडिलांच्या तो लाडका होता,

सकाळी सात वाजता दुःखाची घटना घरी माहिती पडताच घरात एकच हंबरडा फुटला व परिसरातील नागरिक शोकाकुल झाले व हळहळ व्यक्त करीत होते. कृष्णा हा घरातील करता होता व साऱ्या कुटुंबाचे ओझे त्याच्यावरच होते, फोटोग्राफी क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक केलेले होते,त्याच्या पश्चात आई वडील ,पत्नी ,दोन वर्षाचा मुलगा दोन बहिणी आजी आजोबा, काका काकू असा परिवार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार