VIDEO : अरे बापरे.. चालू गाडीवर बिबट्याने झडप मारली, बघा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ

Spread the love

सध्या देशात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजक असतात तर काही व्हिडिओ पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. बिबट्याची एक वार आणि समोरच्या प्राण्याचा खेळ खल्लास… बिबट्या वस्तीत शिरलाय, अशी बातमी जरी ऐकली तरी घरातून बाहेर पडणं अवघड होऊन जातं. अशातच एक थरारक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.

बिबट्याचा नेम अगदी अचूक, लक्ष कितीही उंचीवर असला किंवा कितीही लांब असता तरी बिबट्या अचूक ह’ल्ला करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे जंगलातच काय तर मानवी वस्तीत देखील त्याच्या नावाची दहशत असते. अशातच आसामच्या जोरहाटमधील पिसळलेल्या बिबट्याने गाडीवर हल्ला केल्याची घटना घडली असल्याचे फुटेज समोर आले आहे. खरं पाहता हा बिबट्या खुंखार आहे, यापूर्वी या बिबट्याने काही लोकांवर ह’ल्ला करून जखमी केलेले आहे.


वाघ, सिंह, बिबट्यासारखे हिंस्र प्राणी छोट्या मोठ्या प्राण्यांना त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि शिकार करतात. एका बिबट्यानेही मोठी शक्कल लढवत थेट गावात जाऊन एका गोठ्यातील प्राण्याची शिकार केली. नंतर दिवस उजाडल्यावर बिबट्या चालाखी करत मानव वस्तीत गेला. मात्र सावध झालेल्या गावकऱ्यांनी बिबट्या शिकार कारायला आल्याचा अंदाज येताच आपापले जनावरे लपवली. अखेर शेवटी बिबट्याने त्याचा रंग दाखवला आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या माणसाला जमिनीवर पाडून ह’ल्ला करायला सुरुवात केली. बिबट्याने शिकार करण्यासाठी बुद्धीचा कस लावला अन् शिकार करण्याचं ध्येय गाठलं. बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसुन येईल की, जंगलातील एक बिबट्या शिकार करण्यासाठी मानवी वस्तीत शिरला होता. त्यानंतर वनअधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेतली. त्यावेळी काही सजग असलेल्या लोकांनी बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिबट्या आणखीन पिसळला.

पहा व्हिडिओ :

सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे गावातील काही उतावीळ लोकांनी चारचाकी घेऊन बिबट्याला बघायला गेले. आता ही काय बघायची वेळ आहे का?… पण शेवटी लोकं काय करतील ते सांगता येत नाही. अगदी जेसीबी ची खुदाई बघायला सुद्धा तासभर बसून राहतात. इथेही लोक असेच चारचाकी घेऊन बिबट्याला बघायला गेले. मात्र शेवटी संतप्त बिबट्याला कोण रोखणार… हा बिबट्या एका घराच्या भिंतीवर दबा धरून बसला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याची धडपकड सुरू केल्यानंतर बिबट्याने थेट एका गावातील माणसाच्या गाडीवर झडप घातली. नशीब समजा की, या गाडीची खिडकी बंद होती नाहीतर बिबट्या या माणसाचा जीव घेऊनच गेला असता. शेवटी बिबट्या गावाच्या बाहेरच्या बाजूने पळाला. आणि गाडीत बसलेल्या माणसाने जीव मुठीत घेऊन गाडी पळवली. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या भागात मोठ्या प्रमाणात झाडांची क’त्तल केली जाते आहे. त्यामुळे वन्य प्राणी जंगलतून बाहेर शहरात येत आहेत. याआधीही ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातसुद्धा बिबट्या घुसले आहेत.








हे वाचलंत का ?

टीम झुंजार